५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
जवानांसाठी प्राण केव्हा तळमळणार?
भारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते. म्हणजे इथे थरचे वाळवंटही आहे आणि वर्षांतील १२ महिने बर्फाचा जाडसर थर वागवणारी हिमालयातील शिखरेदेखील. वर्षांचे १२ महिने आणि दिवसाचे २४ तास पाऊस पडणारे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणही आहे आणि मानवी वस्ती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक थंड (उणे ६३ अंश सेल्सियस )अर्थात अतिशीत असे वातावरण असलेले ठिकाणही आहे. एवढे सारे वैविध्य एकाच देशात पाहायला मिळणे तसे कठीणच. पण भारतात हे सारे आहे. शिवाय नदी- नाले, पर्वतरांगा तर आहेतच. इथल्या पर्वतरांगाही आगळ्या आहेत.

कव्हर स्टोरी
आता गरज ‘सायबर लष्करा’ची!
जगाची झोप उडविणाऱ्या अमेरिकेचीही झोप उडण्याच्या घटनांमध्ये अलीकडे काहीशी वाढ झाली आहे. ज्युलिअन असांज यानेही दोन वर्षांपूर्वी अमेरिकेची झोप उडवली होती आणि आता एडवर्ड स्नोडेन याने पुन्हा एकदा तेच काम केले आहे. या दोन्ही खेपेस गोपनीय बाबी उघडकीस आल्यानंतर अमेरिकन प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. आताही स्नोडेनने उघड केलेल्या गोपनीय बाबींमुळे अमेरिकन सरकार एक पाऊल मागे जाऊन बॅकफूटवर खेळते आहे. ६ जूनची सकाळ उजाडली तीच अमेरिकन सरकारचे मनसुबे उधळत. चीनचे राष्ट्राध्यक्ष ली जिनिपग अमेरिकेच्या भेटीवर येत होते. याच भेटीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांची सविस्तर चर्चा व्हायची होती. संपूर्ण जगाचे लक्ष या चर्चेकडे लागले होते. कारण यातील चीन ही भावी तर अमेरिका ही विद्यमान महासत्ता आहे. भविष्यातील जगाच्या डोलाऱ्याचा तोल या दोन महासत्तांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांवर ठरणार आहे. म्हणून ही भेट महत्त्वाची होती. अमेरिकेने त्यासाठी खूप मोठी तयारी केली होती. अर्थात चीनचीदेखील तयारी होतीच.

प्रलय
उत्तराखंडचा इशारा...
केदारनाथ येथे ढगफुटी
५०,००० यात्रेकरू अडकले
चारधामचे रस्ते अनेक ठिकाणी खचले
मृतांचा आकडा पाच हजारांवर जाण्याची शक्यता

उत्तराखंड म्हणजेच देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चारधाम परिसरातील या बातम्यांनी गेल्या आठ दिवसांत संपूर्ण देश काळवंडून गेला आहे. जो तो आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याच्या मागे लागला आहे. कोणी ग्लोबल वॉर्मिगचे पिल्लू सोडून देत आहे. तर काही अतिउत्साही धर्माध मंडळी प्रलय वगरेच्या कथा पसरवत आहेत. पण हे सारे घडण्यामागे काही मूलभूत नसíगक आणि मानवी गोष्टी आहेत याचाच आपल्याला विसर पडला आहे. वास्तविक नसíगक नव्हे तर मानवी हस्तक्षेपाच्याच घटना जास्त आहेत. आजचे हे भयंकर दृश्य केवळ नसíगक आपत्ती आहे की आपल्याच अनियंत्रित वागणुकीचा फटका आहे, याचा खरं तर विचार करण्याची ही वेळ आहे.


मान्सून डायरी
आगुम्बेमधला पाऊस
‘‘देश म्हणजे काय?’’
पहिल्या मीटिंगला मयूरेशने विचारलेला पहिला प्रश्न.
‘‘अं.. अं.. भौगोलिक किंवा राजकीय सीमांचा प्रदेश, ठरावीक संस्कृती, भाषा, ठरावीक हवामान वगरे वगरे..’’
‘‘बरं आता सांगा, भारत म्हणजे काय?’’
त्याचा दुसरा प्रश्न.
आम्ही त्याही प्रश्नाची दिलेली उत्तरेही अशीच. भारतीय उपखंड, राजकीय सीमा, संस्कृती आणि त्याचं भारताशी नातं. थोडक्यात शाळेत भूगोलाच्या तासाला पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी. देश, भारत, समाज, भारतीय अर्थव्यवस्था असे वेगवेगळे प्रश्न आणि आम्हाला जमतील अशी आम्ही दिलेली ठोकताळ्यातील उत्तरे. बराच वेळ प्रश्नोत्तरांचा हा क्रम चालू होता, पण या प्रश्नोत्तरांचा संदर्भ काय हे मात्र कळत नव्हतं.

चर्चा
गरज डॉक्टर-रुग्णांच्या सुसंवादाची...
गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संबंध वेगवेगळ्या कारणांनी बिघडले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डॉक्टर, वैद्यक उपचार याबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहेत. डॉक्टर नीट ऐकूनच घेत नाहीत, व्यवस्थित बोलतच नाहीत, खेकसतातच, व्यवस्थित तपासतच नाहीत, स्वत:च्याच मनाच्या धुंदीत असतात, अशी बरीच विधाने रुग्ण, त्यांचे नातेवाईक नोंदवत असतात.
आपल्या मनोशारीरिक समस्या सोडवणुकीसाठी डॉक्टरांनी मनापासून प्रयत्न करावे व त्यात त्यांनी यशस्वी‘च’ व्हावे, अशी रुग्णांची अपेक्षा असते व ती रास्तही आहे, पण डॉक्टर हासुद्धा माणूस आहे आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा असल्याने रुग्णाच्या प्रत्येकांनी प्रत्येकच समस्यांचे, रोगोद्भवजन्म, कारणांचे निदान डॉक्टरांना होईल, प्रत्येक वेळी सांगितल्यानुसारच होऊन आजारमुक्ती, मरणमुक्ती मिळेल असं नसतं. कारण वैद्यकशास्त्र हे संस्थाशास्त्रासारखे नसते! डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेलासुद्धा कधी कधी अपयश येऊन रुग्ण वाचू शकत नाही.

क्रीडा
रावडी राठोड !
‘‘शिखर धवनला तुम्ही भारतीयांनी कुठे दडवून ठेवला होता, कारण गेली काही वर्षे आम्ही भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हेच सलामीवीर म्हणून पाहत आलो आहोत, पण शिखर हा एक अद्भुत युवा खेळाडू आहे. त्याच्यामधला बेदरकारपणा काही महान फलंदाजांची आठवण करून देणारा आहे,’’ असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नसीर हुसेन याने केले होते. इंग्लिश लोक तसे खाष्ट, एखाद वेळेस निंदा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, पण त्यांच्याकडून येणारी स्तुती आकाशात एखादा धूमकेतू दिसावा तशीच. धवन सध्या यशाच्या शिखरावर आहे, हे कुणी सांगायला नको, कारण त्याची चॅम्पियन्स करंडकातली बेधडक फलंदाजी साऱ्यांनी पाहिली आहे. चॅम्पियन्स करंडकातली त्याने उघडलेल्या धावांच्या टांकसाळीला कुलूप लावणे कोणत्याही गोलंदाजाला जमलेले नाही. आता त्याची फलंदाजी पाहिल्यावर याला यापूर्वी का संघात घेतले नाही, हा प्रश्न नक्कीच पडतो, पण ठेच लागल्यावर हे शहाणपण शिखरला सुचलेले आहे, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.


वाइल्डक्लिक
खेळ निसर्गाचा!
कृष्ण ढगांची दाटी झाली. विजांच्या लखलखाटात, गरजत बरसत पावसाचे आगमन झाले. तहानलेली जमीन कृतार्थ झाली आणि तिचा गर्भसुगंध आसमंतात दरवळू लागला. निसर्गातल्या या आनंद सोहळ्याचे अनोखे क्षण पकडण्यासाठी हाडाच्या, भटक्या फोटोग्राफर मंडळींनी कॅमेरे सरसावले. आकाशातला प्रकाशाचा खेळ, चकवा देणारी पण आसमंत उजळून टाकणारी वीज, मन मोहून टाकणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण हे सारंच मागच्या महिन्यात टिपून झालं, आता..?
आता सुरू झाला आहे निसर्गाचा एक वेगळाच खेळ, त्यासाठी सज्ज व्हा आणि निघा घराबाहेर. अंगावर हिरवीगार चादर ओढून घेतलेल्या डोंगरदऱ्या आणि माळरानांकडे धाव घ्या! तिथेच सुरू होतोय निसर्गातील कायापालटाचा एक अद्भुत खेळ. वर्षभरात कधीच दृष्टीस पडणार नाहीत अशा अनेक घटना आता घडू लागतील आणि हे नवं स्वरूप कॅमेरात टिपणं म्हणजे काय आनंद असतो, हे एका फोटोग्राफरशिवाय कोण जाणतो!

भविष्य